सिडनी: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. ३ जानेवारीपासून या सामन्याला सुरूवात झाली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ १८५ धावाच करता आल्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने १०१ धावांत आपले ५ गडी गमावले आहेत. एलेक्स कॅरी आणि ब्यू वेबस्टर क्रीजवर आहेत.
भारताच्या पहिल्या जावात सर्वाधिक४० धावा ऋषभ पंतने केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४ विकेट स्कॉट बोलँडने घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह या सामन्यात नेतृत्वत करत आहे. तर रोहित शर्माने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
पर्थमध्ये भारताने पहिला कसोटी सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने १० विकेटनी सामना जिंकला. यानंतर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णीत राहिली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जबरदस्त विजय मिळवला.