मोखाडा : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे. येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. प्रस्तूत कार्यालयाची इमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवितालाही धोका होणार असल्याने सदर इमारतीची तत्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवास्यांकडून केली जात आहे. मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या खोडाळा मंडळ कार्यालयातून परिसरातील ३० हून अधिक गांवांतील शेतीविषयक कामकाज तसेच ईतरही अनेक विकास कामे केली जातात त्यामूळे येथे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरं, मिटिंग, दैनंदिन कामे इ कामे करतांना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचाऱ्यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे.
Devendra Fadnvis : उशीरा सुचलेलं शहाणपण! चक्क सामनातून फडणवीसांचे कौतुक!
मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे. या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झालेल्या आहेत. त्यामूळे ईमारतीचा धोका आणखीनच वाढलेला आहे. बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक ईमारतीची व परिसरातील रहिवाशांच्या जीवीताची दखल घेवून ईमारतीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे. १९७२ साली प्रशिक्षण व भेट योजना आमलात होती त्यावेळी सदर ईमारत ही प्रशिक्षण व भेट योजनेकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
दरम्यानच्या ५० वर्षात या ईमारतीची कोणत्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही. ईमारतीच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोठे झाड उगवले असून त्याची मुळे भिंतीत घुसली आहेत त्यामुळे सदर भिंत ही केंव्हाही जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच वस्ती असून खेटून असलेल्या घरांवर भिंतीचे अवशेष पडल्यास मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होऊन संभाव्य जीवित हानी टाळता येणार नाही त्यामुळे सदर इमारत तातडीने निष्काशीत करणे आवश्यक आहे.