नवी मुंबई : सध्या राज्यभरातून गोळीबाराच्या अनेक घटना कानावर येत आहेत. असे असले तरी आता मुंबई शहर देखील त्यात मागे राहिले नाही. नवी मुंबईतील सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील डी मार्ट जवळ हा गोळीबार झाला. दोन दुचाकीस्वारांनी पाच ते सहा राऊंड फायर केले. आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाबाबत तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने नवी मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.