Captain Jasprit Bumrah : सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

सामना न खेळण्याचा रोहित शर्माचा निर्णय


नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. रोहित शर्माने स्वतः हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मांने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे रोहितच्या जागी भारतीय उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.



३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. मात्र, पुढच्या तीन सामन्यातील २ मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे जसप्रीत बुमराहशी दिर्घ चर्चा करताना दिसले.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार

नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला

आयपीएलचा लिलाव पुन्हा परदेशात?

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पुन्हा एकदा परदेशात होणार आहे. २०२६ च्या हंगामासाठीचा हा लघु-लिलाव १५ ते १८ डिसेंबर

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन