Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीSantosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटनेचे राज्यात...

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटनेचे राज्यात ३ दिवस काम बंद आंदोलन

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या (Santosh Deshmukh murder case) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या घटनेतील काही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी (२८) बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. आता राज्यभरातील ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीला घेऊन आजपासून सरपंच संघटनेने राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्रात एकूण २७,९५१ ग्रामपंचायती सहभागी होत आहेत.

Ghatkopar Hoarding Collapsed : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपीला लखनौमधून अटक!

महाराष्ट्रात ३५१ पंचायत समित्या किंवा ब्लॉक पंचायती आहेत. भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ७ पंचायत समित्या असून ५४१ ग्रामपंचायती आणि ८६६ गावे आहेत. ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज पुढील तीन दिवस ठप्प होणार असून याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -