Pune Grand Army Day : पुण्यात साजरा होणार भव्य आर्मी डे!

पुणे : भारतीय सैन्यदलाचा ७७ वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ३ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.


भारत देश स्वतंत्र होताच १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी ले. जन. के. एम. करिअप्पा यांची निवड झाली. तेव्हापासून १५ जानेवारी हा भारतीय लष्कराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शहरात १५ जानेवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



दक्षिण कमांड येथे ३ ते ५ जानेवारीदरम्यान आर्मी मेळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश खुला राहणार आहे. आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या सैन्यदलाच्या मैदानावर लष्कराच्या वतीने संचलनासह अत्याधुनिक शस्त्रांंचे विलोभनीय दर्शन होणार आहे. तसेच, लष्कराच्या वतीने मिशन ऑलिम्पिकसारखे सजीव देखावे साकारणारे रथ या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे