दापोलीत पाच पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा

Share

दैनिक प्रहारचे दापोली प्रतिनिधी रूपेश वाईकर यांना युवा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार जाहिर

दापोली : दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा निवड समितीने केली असून दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी या पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडणार असून तब्बल ४९ वर्षानंतर दापोली विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळाल्याबद्दल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचा ह्दयसत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पर्यावरण विषयक पत्रकारितेसाठी निवेदिता फास्ट न्यूजचे संपादक प्रशांत परांजपे यांचा सन्मान करण्यात येणार असून दापोलीतील प्रसिध्द आणि सर्वाधिक चर्चेत   DNA न्यूज दापोलीचे संपादक प्रशांत कांबळे यांना उत्कृष्ट राजकीय बातमीदारीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर दैनिक सागरचे पत्रकार मंगेश शिंदे यांना सामाजिक पत्रकारितेचा पुरस्कार जाहिर झाला आहे. दैनिक प्रहारचे दापोली प्रतिनिधी रूपेश वाईकर यांना युवा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार जाहिर झाला असून दैनिक सागरचे महेश महाडीक यांना सातत्यपूर्ण पत्रकारितेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी तब्बल ४९ वर्षानंतर दापोली विधानसभा मतदार संघाला लाभलेल्या राज्यमंत्री पदाच्या सन्मानार्थ ना. योगेशदादा कदम यांचा दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ह्दयसत्कार करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कोकणातील प्रसिध्द उद्योजक भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अक्षय फाटक, कोकणच्या सहकार क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे माजी अध्यक्ष श्री. राकेश कोटिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा पुरस्कार व सत्कार सोहळा दि. ६ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहामध्ये सायं. 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला दापोलीतील पत्रकार, विद्यार्था आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, सल्लागार जगदीश वामकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद रानडे यांनी केले आहे.

Tags: dapoli

Recent Posts

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

3 minutes ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

17 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

17 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago