PMP Bus Travel : अनुयायांचा प्रवास होणार सुलभ! दोन दिवस पीएमपीची मिळणार मोफत बस सेवा

पुणे : पीएमपीडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा (PMP Free Bus Service) देण्यात येणार आहे. मंगळवार ३१ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून बुधवारी १ जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा सुरू असणार आहे. त्यासाठी लोणीकंद विभाग आणि शिक्रापूर विभागातून विविध मार्गांवरून बस धावणार असून, अनुयायांना सुलभ प्रवास करता येणार आहे, अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.


कोरेगाव भीमा येथे नववर्षारंभी विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. अनुयायांची वाढती संख्या ध्यानात घेऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी ‘पीएमपी’कडून दर वर्षी मोफत बससेवा देण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही सेवा देण्यात येत आहे.



काय आहेत मार्ग?


लोणीकंद विभागामार्फत मंगळवारी दुपारी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचवन, फुलगाव शाळा आणि पेरणे गावापर्यंत ७५ मोफत बसचे नियोजन करण्यात आले आहे, तर बुधवारी पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत २५० बस याच मार्गांवरून धावणार आहेत.


शिक्रापूर विभागातून मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रस्ता ते कोरेगाव भीमा विजयस्तंभापर्यंत १४० बस मार्गावर असतील. त्याचबरोबर वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढूपर्यंत दहा बसचा वेगळा मार्ग असणार आहे, तर बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ३५० बस याच मार्गावरून धावणार आहेत. (PMP Bus Travel)



कसे असेल बसचे नियोजन?


पुणे रेल्वे स्थानक मोलेदिना बसस्थानक - ३१ जादा बस
मनपा भवन बसस्थानक - ३३ जादा बसव
दापोडी मंत्री निकेतन - ०२ जादा बस
ढोले पाटील रस्ता मनपा शाळा - ०२ जादा बस
अप्पर डेपो बसस्थानक - ०४ जादा बस
पिंपरी आंबेडकर चौक - ०३ जादा बस

Comments
Add Comment

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी