मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्याने खालावत असून प्रदूषणाच्या (Pollution) बाबतीत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुक्याचे साम्राज्य होते. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला असून बोरिवली, कांदिवली, मालाड, माझगाव, नेव्हीनगर या ठिकाणी तर या वाईट हवेने टोक गाठल्याचे पहायला मिळाले. (Mumbai Pollution)
पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे विकास प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धूलिकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धूलिकण आहेत त्यानुसार केले जाते. धूलिकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते. अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळणारा एक छोटासा पदार्थ असून, या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २.५ ची मात्रा जास्त असते, तेव्हा धुक्याचे किंवा धूलिकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते.
अतिसूक्ष्म धूलिकणांपेक्षा किंचित मोठा म्हणता येईल, असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धूलिकणाला पीएम १० म्हटले जाते. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) निर्देशांक ० ते ५०० मध्ये विविध स्तरावर मोजला जातो. त्यानुसार त्याचा चांगला, वाईट असे स्तर ठरतो. सकाळी मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आणि प्रदूषण असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दिवस वायुप्रदूषणाची पातळी खाली येईपर्यंत मॉर्निंग वॉक थांबविण्याची गरज आहे. सकाळी वारा वाहण्याचे प्रमाण अधिक असल्याने धुळ आिण धुर अिधक प्रमाणात उडते. याचा परिणाम वातावरणावर होतअआहे. या वातावरणात प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात जात आहे. प्राणवायू शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. मेंदूला रक्तपुरवठा करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करा. शक्य असल्यास योग आणि प्राणायाम करा. (Mumbai Pollution)
बोरिवली : २६९, मालाड : २४३,नेव्ही नगर : २२८,कांदिवली : २०७, माझगाव : २०५,देवनार : २००
हवेचा दर्जा मध्यम : वरळी : १८६, वांद्रे कुर्ला : १५१,: सायन : १४९, घाटकोपर : १३१, भायखळा : १३०, कुर्ला : १२४
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…