Jejuri Somvati Yatra : जेजुरीतील सोमवती यात्रेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल!

'असे' असतील पर्यायी मार्ग


पुणे : बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी सोमवती यात्रा (Jejuri Somvati Yatra) भरणार आहे.  ३० डिसेंबर रोजी  सोमवती अमावास्येनिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने दुपारी १ वाजता खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे गडावरून प्रस्थान केले जाणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांची नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी आणि इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मागनि वळविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.



पर्यायी मार्ग कोणते?



  • बेलसर कोथळे नाझरे सुपे मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे.

  • रामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव सुपा केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामागनि पुणेकडे वळविण्यात येत आहे.

  • पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा फलटण किंवा सासवड वीर फाटा परींचे वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.

  • सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा मोरगाव सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गान पुणेकडे वळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण