मुंबई: OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5 च्या चीनच्या मार्केटमध्ये गुरूवारी लाँच झाले आहेत. नवे स्मार्टफोन्स १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये येतो. यात तुम्हाला ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळतो. याचे रेझोल्युशन १.५ K सोबत येतो. प्रो मॉडेलमध्ये Snapdragon 8 Elite Extreme Edition मिळते.
तर Ace 5मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्हीही स्मार्टफोनमध्ये ५०एमपी कॅमेरा ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप मिळतो. OnePlus Ace 5लाच कंपनी भारतात OnePlus Ace 13R या नावाने लाँच करू शकते.
किती आहे किंमत?
चीनच्या बाजारात OnePlus Ace 5 Proला ३,३९९ युआन(साधारण ३९ हजार रूपये) ला लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 12GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत आहे. तर OnePlus Ace 5 च्या बेस व्हेरिएंटची किंमत २२९९ युआन(साधारण २६ हजार रूपये)इतकी आहे. हा 12GB RAM + 256GB व्हेरिएंट आहे.
Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल
काय आहेत स्पेसिफिकेशन?
ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5ला अँड्रॉईड १५सोबत लाँच केला आहे. चीनमध्ये हा फोन color OSसोबत येतो. दरम्यान, भारतात वनप्लसचे फोन्स Oxygen OS सोबत लाँच होतो. स्मार्टफोन्स ६.७८ इंचाचा फुल एचडी डिस्प्लेसोबत येतो. फोनमध्ये मेटल फ्रेम आणि ग्लास बॅक देण्यात आला आहे.
OnePlus Ace 5 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Extreme Edition प्रोसेसरह येतो. तर Ace 5मध्ये Snapdragon 8 gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 50 एएमपीचा प्रायमरी लेन्स, ८ एमपी सेकंडरी लेन्स आणि २ एमपी मॅक्रो सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.