मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल.
या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा ऑफर करते. याची व्हॅलिडिटी बेस प्लान इतकीच असते.
जर तुमचा बेस प्लान ७० दिवसांचा आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी १९ रूपयांचा रिचार्ज केला तर तुम्ही ७० दिवसांपर्यंत १ जीबी डेटा वापरता येतो. दरम्यान, कंपनीने या प्लान्सच्या व्हॅलिडिटीबमध्ये बदल केला आहे. आता या वाऊचर्ससोबत तुम्हाला बेस प्लान इतकी व्हॅलिडिटी मिळणार नाही.
१९ रूयांच्या डेटा वाऊचरसाठी १ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी १ जीबी डेटा मिळेल. तुम्ही ज्या दिवशी रिचार्ज कराल तर त्या दिवसासाठी तुम्हाला डेटा मिळेल. तर २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल बोलायचे झाल्यास यात ग्राहकांना २ दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी २ जीबी डेटा मिळेल.
नुकत्याच ट्रायने दिलेल्या एका आदेशात टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएससाठी वेगवेगळे रिचार्ज करा असे म्हटले आहे. जिओ आणि एअरटेलने अशा रिचार्ज प्लान्सना विरोध करत होते. आता त्यांना या पद्धतीचे प्लान जारी करावे लागेल याची किंमत कमी होईल.