Wednesday, March 19, 2025
Home'ती'ची गोष्टMenstrual Periods Problems : महिन्यातल्या 'त्या' पाच दिवसांची घडी विस्कटतेय तर हे...

Menstrual Periods Problems : महिन्यातल्या ‘त्या’ पाच दिवसांची घडी विस्कटतेय तर हे करणे टाळाचं

मुंबई : स्त्रियांचे आरोग्य आणि मानसिक पाळी यांचे घनिष्ठ संबंध आहे. अनेकदा महिलांना मासिक पाळीबद्दल बऱ्याच समस्या जाणवतात. पूर्वीच्या महिलांची जीवनशैली त्याचबरोबर आताच्या महिलांच नेहमीचे वेळापत्रक यात साम्यता आढळते. जेवणापासून ते अगदी नेहमीच्या कामाच्या वेळाही अगदी विरुद्ध झाल्या आहेत. नियमित पाळी न येणे ही समस्या याच घटकांतून वर आली आहे.

खूप झोपणे, वजनात बदल, अयोग्य आहार, मानसिक ताण हे घटक नियमित पाळी न येण्यास कारणीभूत आहे. महिलांनी आपल्या शरीराला आवश्यक तेवढीच झोप घेणे गरजेचं आहे. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास पाळी नियमित येते. अन्यथा स्थूलपणा वाढतो विशेषतः तरुणांमध्ये ही लक्षणे जाणवतात. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीतजास्त बाहेरच खाणे टाळावे. उत्तम आहार उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. अचानक वजनात वाढ झाल्याने किंवा वजन कमी झाल्याने मासिक पाळीवर त्याचा परिणाम होतो.

Thirty First Party : ‘थर्टी फर्स्ट’ पार्टी करताय? परवानगी घेतली का?

त्याचबरोबर जस जंक फूड मासिक पाळीला हानिकारक आहे तसेच तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.आणि मासिक पाळीत खंड पडणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -