पुणे (प्रतिनिधी): आज किसान सन्मान दिवस २०२४ निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते. आज भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी १९ लाख ६६ हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली आहे.
मी प्रत्येक गरिबाकडे स्वतःचे पक्के घर असले पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी ६ लाखांपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. १३ लाख २९ हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे २ चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा आज शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आणि चौहान यांचे आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती, ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त १३ लाख घरे आपल्याला देण्यात आलेली आहे. कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाही, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये २६ लाख लोकांचे रजिस्ट्रेशन आहे. आता अनेकांना घरे मिळणार आहेत. ज्यांची नावे सुटली होती, जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येतील. इतक्या संख्येने राज्याला घरे देण्याच्या निर्णयावर फडणवीसांनी मोदींचे आणि चौहान यांचे आभार मानले आहेत.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…