Tuesday, March 18, 2025
Homeदेशपंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान 

पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान 

कुवेत सिटी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान,कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी कुवेतच्या ‘बायान पॅलेस’ येथे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली आहे.

भारत आणि कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०.४७ अरब अमेरिकी डॉलर इतका होता. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे, जो देशाच्या तीन टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -