थर्टी फर्स्टची पार्टी महागणार!

नागपूर : ३१ डिसेंबरला जगभर इंग्रजी नवीन वर्षाचा जल्लोष सुरूच असतो. हे नवीन वर्ष साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींना घरबसल्या पार्टी करायला आवडते, काहींना फिरायला आवडत, तर काही क्लब सारख्या ठिकाणी पार्टी करण्यास पसंत करतात. मात्र आता महाराष्ट्रातील क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत. विधान परिषदेत शुक्रवारी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्याने आता क्लबमधील सदस्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जीएसटी व मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत मोठ्याप्रमाणात कर जमा होणार आहे.


कोणत्याही क्लबमध्ये आतापर्यँत मद्याच्या पेगवर वॅट आकारला जात नव्हता. त्यामुळे हॉटेल पेक्षा क्लबचे मद्य स्वस्त होते. मात्र सुधारित विधेयकांनुसार बारप्रमाणेच क्लबच्या पेगवरही १० टक्के व्हॅट द्यावा लागेल. खाद्यपदार्थांच्या मेनूतही हॉटेलप्रमाणेच ५,१२ किंवा १८ टक्केप्रमाणेच क्लबच्या खाद्यपदार्थांवरही जीएसटी भरावा लागेल.



शुक्रवारी विधानसभेने मंजूर केलेले महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले आणि मंजूर झाले. या सुधारणेमुळे एखाद्या संस्थेने किंवा क्लबने सदस्यांना केलेल्या मद्य व खाद्य पदार्थांच्या विक्रीवर आता राज्य सरकारला टॅक्स आकारता येईल. म्हणजेच क्लबला खरेदीवर मिळत असलेल्या सवलतीचा लाभ ते सदस्यांनाही देत होते पण आता नवीन विधेयकांमुळे तसे करता येणार नाही. क्लबने वस्तू विकत घेतली तर त्यांच्यासाठी वेगळा नियम असेल आणि क्लबच्या सदस्यांनी ती घेतली तर त्याला मूल्यवर्धित कर आणि जीएसटी अशा दोन्ही गोष्टी भराव्या लागणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. म्हणजेच आता थर्टी फर्स्ट पूर्वीच क्लब महागणार आहेत.


Comments
Add Comment

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर