कुवेतच्या सर्वोच्च नेतृत्वाची घेणार भेट
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दोन दिवस कुवेत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यासाठी ते रवाना झाले असून मागील ४३ वर्षातील भारतीय पंतप्रधानांची कुवेतची ही पहिलीच भेट असणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत. आज कुवेतला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. कुवेतमध्ये अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!
कुवेतला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘भारत आणि कुवेत हे केवळ व्यापार आणि ऊर्जा भागीदार नाहीत, तर पश्चिम आशियातील शांतता, सुरक्षा आणि स्वैर्वामध्येही त्यांचे समान हित आहे. पिढचानपिढचा असलेल्या कुवेतसोबतच्या आमच्या ऐतिहासिक संबंधांना आम्ही खूप महत्त्व देतो. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील’, असे पंतप्रधानांनी लिहिले आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi emplanes for Kuwait.
PM Narendra Modi is on a 2-day visit to Kuwait at the invitation of Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of the State of Kuwait. This will be the first visit of an Indian Prime Minister to Kuwait in… pic.twitter.com/rnkgIxSQmf
— ANI (@ANI) December 21, 2024