ST Bus Location : प्रवाशांसाठी गुुडन्यूज! लोकलप्रमाणे आता लालपरीचेही दिसणार लोकेशन

  270

सोलापूर : चाकरमान्यांसह इतर प्रवासी प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजेच एसटी बसला (ST Bus) देतात. मात्र अनेकवेळा एसटी बस स्थानकावर बस येण्यास विलंब होतो. तर कधी पाहुणेमंडळी एसटी बसमधून प्रवास करत असताना त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे एसटी बस नेमकी कुठे आहे असा प्रश्न सतावत असतो. मात्र आता या प्रश्नांना पुर्णविराम मिळणार आहे.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) नवी सविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या एसटी बसचे लोकेशन (ST Bus Location) घरबसल्या पाहता येणार आहे. ही नवीन यंत्रणा नववर्षापासून सुरु होणार आहे.



जीपीएस अ‍ॅपची सुविधा


आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना 'जीपीएस' सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या अॅपद्वारे समजणार आहे.



व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे...



  • अ‍ॅन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार महामंडळाचे 'एमएसआरटीसी' अॅप

  • महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल अॅपवरुन समजणार

  • गुगल मॅपवरुन समजणार बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही

  • हात करूनही बस थांबली नाही, प्रवाशाने केलेल्या या तक्रारीची अॅपवरुन होईल खात्री

  • एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांचीही दूर होणार चिंता, त्यांनाही येणार वेळेचा अंदाज

Comments
Add Comment

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा

कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची