Central Railway : मुंबई-नागपूर प्रवास होणार आरामदायी! मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

  259

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता  मुंबई - नागपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा आता आरामदायी प्रवास होणार आहे.



कसे असेल वेळापत्रक?



  • लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर साप्ताहिक विशेष (२ सेवा)


०२१३९ साप्ताहिक विशेष २१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)


०२१४० साप्ताहिक विशेष नागपूर येथून २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. (१ सेवा)




  • थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

  • संरचना : एक प्रथमसह -द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

  • आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग २० डिसेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा