Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी...

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली तारीख

नागपूर : लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही बँक खात्यात जमा झालेला नाहीय. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात थेट १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले होते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुद्दा पार पडला. पण अद्यापही डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच मिळणार आहे. तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकरसंक्रातीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Air Pollution : बिल्डरांनो, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा…

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे या योजनेचे एकूण पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यामध्ये लाडक्या बहिणींचे मोठे श्रेय असल्याचे मानले जातेय. कारण निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महायुती सरकारने घोषणा केली. अशातच पुन्हा निवडून आल्यास १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असे आश्वासन जाहीरनाम्यात महायुतीने दिले. यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये कधी देणार? याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला होता.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. सभागृहात फडणवीस म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ज्या-ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्या सर्व योजना सुरू राहतील. राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणींनी निवडणुकीत महायुती सरकारवर प्रेम दाखवले. त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे.’, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

फडणवीस पुढे असेही म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू केलेली बंद होऊ देणार नाही. या योजनेसाठी कोणतेही निकष बदण्यात आलेले नाहीत. पण ज्यांनी चार-चार खाती उघडली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे, कारण तो आपला, जनतेचा पैसा आहे. त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल तर ते समोर आले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२१०० रुपयांबाबत निर्णय कधी होणार?

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतील मानधन १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -