Maharashtra Cabinet Expansion: आमदार नितेश राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

मुंबई: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) नागपुर येथे पार पडला. या हिवाळी अधिवेशनात भाजपकडून एकूण १९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली. यामध्ये कणकणवली मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.


आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या रूपाने राज्यातील मंत्रिमंडळामध्ये तरूण चेहरा मिळाला आहे.


 


निवडणुकीत सलग तिसरा विजय


नितेश राणे सलग तिसऱ्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आहेत. नितेश राणे २०१४मध्ये पहिल्यांदा कणकवली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंत २०१९मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक साधली.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी