MLA Nitesh Rane : आ. नितेश राणे यांच्या मागणीवरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वे गाडीला वैभववाडीत थांबा

कणकवली :०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन प्रशासनाने वैभववाडी स्थानकावर ही गाडी जाता-येता थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे आमदार नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहेत.


याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते गोव्यातील करमळी दरम्यान दररोज चालवण्यात येणाऱ्या विशेष गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी आणि सावंतवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत, असे जाहीर केले आहेत. हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.



या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विशेष गाड्या पुढीलप्रमाणे असतील : गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी-करमळी विशेष (दररोज) मुंबई सीएसएमटी येथून ००.२० वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता ती पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी-मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज) करमळी येथून १४.१५ वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल व मुंबई सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता ती पोहोचेल.


थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम.


डब्यांची रचना : एकूण २२ डबे - प्रथम वातानुकूलित - १ डबा, मिश्रित (प्रथम वातानुकूलित + द्वितीय वातानुकूलित) -१ डबा, द्वितीय वातानुकूलित-३ डबे, तृतीय वातानुकूलित-११ डबे, स्लीपर-२ डबे, सामान्य -२ डबे, एसएलआर-२ डबे. या गाडीला सावंतवाडी आणि वैभववाडी या दोन महत्त्वाच्या तालुक्यात थांबा मिळाला असल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच आमदार नितेश राणे यांनी हे थांबे मिळावेत म्हणून केलेल्या प्रयत्नाबद्दल जनतेतून आभारही व्यक्त केले जात आहेत.


Comments
Add Comment

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

दारूच्या नशेत मुलाने ८० वर्षीय आईचा घेतला जीव!

कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे

विजयदुर्गमध्ये रोरो प्रवासी बोटीचे जल्लोषात स्वागत

विजयदुर्ग : कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा

मालवण : सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी

नवे सहकार धोरण देशात परिवर्तन घडवेल!

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.