मुंबई : दर रविवारी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या देखील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी ८ ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.
पनवेल येथून सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी ते दुपारी ३ वाजून ४९ मिनिटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९ वाजून ४५ मिनिट ते दुपारी ३ वाजून १२ मिनिटांपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ११ वाजून २ मिनिट ते दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १० वाजून १ मिनिट ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…