Indapur Karmala : इंदापूर-करमाळा ऋणानुबंध जुळणार

पाणलोट येथील कुगाव-शिरसोडी पुलाचे काम सुरू


पुणे : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने इंदापूर-करमाळा तालुक्यांतील ऋणानुबंध ५० वर्षांनंतर पुन्हा प्रस्थापित होणार आहेत. उजनी जलाशयामुळे दोन्ही तालुक्यांतील दळणवळण जिकिरीचे झाले होते. दीर्घ काळापासून असलेल्या जोडपुलाच्या मागणीला निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळाली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.


भीमा नदीकाठच्या पाणवठ्यावर हमखास भेटणाऱ्या दोन जिल्ह्यांतील लोकांमध्ये ५० वर्षांपूर्वी ऋणानुबंध जुळले होते. मात्र, उजनी धरणाच्या पाण्यामुळे त्यात दुरावा निर्माण झाला होता. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर इंदापूर तालुक्यातील गावांना करमाळा तालुक्यातील हाकेच्या अंतरावरील गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने ८० ते ९० किलोमीटरचा वळसा घालून किंवा जलमार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. जलवाहतुकीत ५० हून अधिक प्रवाशांना जलसमाधीही मिळाली होती. त्यामुळे उजनी जलाशय जोडपुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.



विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूल उभारणीची घोषणा तातडीने केली आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचे भूमिपूजनही झाले होते. त्यानंतर या कामाला आता प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. त्याबाबत दोन्ही काठच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


"करमाळा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांसाठी ५० वर्षांपूर्वी इंदापूर ही मोठी बाजारपेठ होती. शिक्षणासाठीही अनेक विद्यार्थी इंदापूरला येत असत. मात्र, उजनी जलाशयामुळे त्यामध्ये खंड पडला होता. या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या या पुलाचे काम सुरू झाल्याने दोन्ही बाजूने दळणवळण सुरू होणार आहे." असे इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा म्हणाले.

Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय