मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव आहे. लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असले तरी आजही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्यातच आता महेंद्रसिंग धोनीने २०२४ मध्ये ब्रँड एंडोर्समेंटच्या जगात एक नवा विक्रम रचला आहे. .धोनी हा ब्रँड एंडोर्समेंटचा एक नवा चेहरा बनला आहे.
Holiday Tours : नाताळाच्या सुट्टीत पर्यटकांची ताडोबाला पसंती
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन कूल धोनीने २०२४ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच धोनीने ४२ ब्रँड डील केले आहेत, जे शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या स्टार्सपेक्षाही जास्त आहेत.धोनीने २०२४ मध्ये अनेक मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी केली आहे. यासोबतच तो ब्रँडच्या जाहिरातींच्या संख्येत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याही पुढे गेला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ४१ ब्रँडसोबत करार केले आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानने या कालावधीत ३४ ब्रँड्ससोबत करार केले आहेत.पण धोनीने या दोन्ही दिग्गजांना मागे टाकत ४२ ब्रँड्सशी करारांवर स्वाक्षरी केली आहे.
ब्रँडच्या या जाहिरातींमध्ये सिट्रोएन (फ्रेंच कार मेकर), गरूडा एरोस्पेस (ड्रोन तंत्रज्ञान स्टार्टअप), क्लियरट्रिप, पेप्सिको यांचा समावेश आहे. तसेच मास्टरकार्ड, गल्फ ऑइल, (इलेक्ट्रिक सायकल ब्रँड), ओरिएंट इलेक्ट्रिक आणि एक्सप्लोसिव्ह व्हे (फिटनेस आणि न्यूट्रिशन ब्रँड) यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान असो, खेळ असो की फिटनेस, धोनी हा प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. धोनी आता फक्त IPL मध्येच खेळत असला तरी, कंपन्या त्याच्याशी कराराद्वारे जोडले जाण्यास अजूनही उत्सुक आहेत.
धोनी आगामी हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला ४ कोटी रुपये मानधनावर कायम ठेवले आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी जुना नियम पुन्हा लागू केला होता, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूने गेल्या ५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल किंवा सलग ५ वर्षे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळत असेल नसेल, किंवा तो प्लेइंग 11 चा भाग नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. या नियमानुसार धोनी अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. कारण त्याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. तसेच जून २०१९ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.