राज्यातील वाघांची संख्या वाढतेय

अमरावती: महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. २००६ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १०३ इतकी होती. २०१० च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १६८ वर पोहोचली. २०१४ मध्ये महाराष्ट्रात एकूण १९० वाघ होते. पुढील चार वर्षात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.


२०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात ३१२ वाघ होते. वाघांच्या संख्यावाढीचा आलेख पुढील चार वर्षे देखील कायम राहिला. २०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार आज महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. राज्यात वाघांचे प्रमाण हे २३ टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत आहेत, असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी सांगितले.


व्याघ्र संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज :- आज वाघांच्या बाबतीत जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. १९०० मध्ये भारतात एकूण ४०,००० वाघ होते. १९७१ मध्ये दुर्दैवाने भारतात केवळ १८०० वाघ उरले होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या मोठ्या प्रमाणात खालावलेल्या संख्येची गांभीर्याने दखल घेत भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ हे कलम लागू केले. तसेच १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प योजना जाहीर केली.


व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी : - व्याघ्र प्रकल्प योजनेमुळे वाघांसह जंगलातील इतर प्राण्यांचे संरक्षण व्हायला लागले. आता वाघांची संख्या वाढायला लागली असतानाच हे वाघ जंगलाबाहेर जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी राहणार आहे. वाघ आणि मानवांचा संघर्ष होणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. वाघांची शिकार होणार नाही, याबाबत देखील व्याघ्र प्रकल्पासह वन विभागाला सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे देखील यादव तरटे म्हणाले.


वाघांची ७० टक्के संख्या भारतात :- २०१८ मध्ये संपूर्ण जगात एकूण ३८९० वाघ आढळून आले आहेत. २०१८ मध्ये भारतात वाघांची संख्या ही २९६७ इतकी होती. आज 2023 मध्ये भारतात एकूण ३१६७ वाघ आहेत. या ३ हजार १६७ वाघांपैकी ४४६ वाघ हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ही सर्वाधिक विदर्भात आहे. वाघांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास देखील यादव तरटे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८