मुंबई: व्यक्तीचा स्वभाव, भविष्य त्या व्यक्तीच्या मूलांकावर आधारित असते. मूलांक व्यक्तीच्या जन्मतारखेवर अवलंबून असतो. अंक ज्योतिषानुसार(Numerology)मूलांक ४चे लोक अतिशय विश्वास असतात. या मूलांकाच्या व्यक्ती वाईट काळातही तुमची साथ सोडत नाहीत.
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील ४,१३, २२ आणि ३१ या तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ४ असतो. अंक ज्योतिषानुसार मूलांक ४चा स्वामी ग्रह राहू आहे. असे म्हणतात की या ४ तारखेला जन्मलेले लोक कोणत्याही परिस्थितीत आपले वचन पूर्ण करतात. वाईट काळात नेहमी तुमची साथ देतात.
असे मानले जाते की या व्यक्तीचा मूलांकाच्या लोकांना व्यवस्थित राहणे आणि कायदा पसंत आहे. हे लोक नियम आणि वेळ व्यवस्थित पाळतात. अंक ज्योतिषानुसार मूलांक ४चे लोक खूप मेहनती असतात. आणि वेळेवर आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करत असतात.
सोबतच हे लोक कठीण परिस्थितीला घाबरत नाहीत.या लोकांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते काहीही झाले तरी मागे हटत नाहीत. या तारखांना जन्मलेले लोक चांगले पार्टनर बनतात. कारण एखाद्याला साथ द्यायची ठरवली तर ते कधीच मागे हटत नाहीत.