ओटावा : कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. कॅनडातील एडमंटन येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड!
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदीप नावाचा भारतीय तरुण कॅनडामध्ये शिक्षण घेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र शुक्रवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबाराच्या आवाजामुळे १०७ एव्हेन्यू भागातून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असता हर्षदीपचा मृतदेह तेथे आढळून आला.
दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे वय ३० च्या आसपास असून दोघांवर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्हीत काय दिसले?
३ जणांच्या टोळक्याने हर्षदीपला आधी पायऱ्यांवरून खाली फेकले आणि नंतर त्याच्यावर मागून गोळीबार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यामध्ेय हर्षदीपचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष दिसत आहेत. त्या माणसाच्या हातात बंदूक आहे आणि तो सतत ओरडत आहे. तर महिला आणि काही लोक त्याच्याभोवती उभे होते. त्यानंतरच सर्वांनी मिळून हर्षदीपला पायऱ्यांवरून खाली फेकले आणि त्याच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, कॅनडाच्या पोलिसांनी अद्याप व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.