Eknath Shinde : ‘उगाच मारकडवाडीला जाऊ नका, करेक्ट कार्यक्रम होईल’; पहिल्याच भाषणात शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणात विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.



‘कर नाही, त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर’


एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचेही अभिनंदन करतो. मी म्हणालो होतो.. २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आलो नाही तर शेती करायला जाईन. २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले...अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे ..त्यानुसार २३७ आमदार आहेत. ‘कर नाही, त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर’, असे शिंदेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर, रामदास आठवले आणि माझी आता युती झाल्याचं मिश्किल विधानही एकनाथ शिंदें यांनी केले. त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झालं आहे. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं. विरोधी पक्षांच्या अध्यक्ष पदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा अभ्यास करुन निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.


दरम्यान, मारकडवाडी येथे सभा घेऊन शरद पवार मागे फिरताच काही ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात एकत्र येऊन राम सातपुतेंच्या समर्थनार्थ आणि ईव्हीएमच्या बाजूने घोषणा दिल्या. ‘जय श्रीराम’च्याही घोषणा दिल्या. यापार्श्वभूमीवर उगाच मारकडवाडीला जाऊ नका, करेक्ट कार्यक्रम होईल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या