Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार नाही- आदिती तटकरे

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये जमा केले जात होते. त्यांनतर आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यावर महायुती सरकारकडून २१०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.


आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. छाननीबाबत चुकीची चर्चा सुरू आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरीत्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच “एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. पण तक्रारी असतील तरच त्याबाबतीतच छाननी होईल, या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,” असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.




महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रूपये करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. दम्यान, विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रूपये करणार असून बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू, असे आश्वासन दिले आहे आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै २०२४ पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२४ पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेस पात्र ठरल्या आहेत.

Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.