मुंबई : राज्यभरात वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, शहरीकरण, बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईलाही प्रदुषणामुळे धोक्याची घंटा दिली आहे. (Mumbai Pollution)
Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली प्रदुषणाचा AQI सध्या 350 आहे. हाच आकडा मुंबई कुर्ला भागातही झाला आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे. काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Pollution)
प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल?
- प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल घराबाहेर जाताना मास्कचा वापर करा.
- प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चष्मा घाला. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. तसेच डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा.
- प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होईल.