मुंबई : काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागराला फेंगल चक्रीवादळ धडकल्यामुळे राज्याला चांगलाच फटका बसला होता. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांना हिवाळा ऋतूमध्ये पाऊस पडत असल्याचे दिसत होते. तर थंडी नाहीशी होऊन ढगाळ वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आता नागरिकांचा हा त्रास काहीसा कमी होणार आहे. राज्यभरात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? रेल्वेच्या या मार्गांवर आज मेगाब्लॉक
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान होते. थंडी गायब झाली होती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवल्यानं अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत.
९ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार आहे. तर आजपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.