Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSwearing in ceremony : ‘महायुती'च्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार

Swearing in ceremony : ‘महायुती’च्या आमदारांचा शपथविधी तर महाविकास आघाडीचा बहिष्कार

मुंबई : राज्यात महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ (Swearing in ceremony) दिली.

दरम्यान, आमदार अबू आझमी आणि बापू पठारे वगळता महाविकास आघाडीतील इतर आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. अबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

ईव्हीएमच्या वापराने लोकशाहीची हत्या होत असल्याने आम्ही शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकत असल्याचे महाविकास आघाडीचे आमदार व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी सांगितले. विधानसभा परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून ‘आय लव्ह मारकडवाडी’चे बॅनर झळकावले.

Ajit Pawar : ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे – अजित पवार

दरम्यान, महाविकास आघाडीने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असताना महाविकास आघाडीचे दोन आमदार अबू आझमी आणि बापू पठारे यांनी शनिवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. अबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

विरोधकांचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याचीईव्हीएमच्या वापराने लोकशाहीची हत्या होत असल्याने आम्ही आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेने दिलेला कौल नाही. हा ईव्हीएम आणि भारतीय निवडणूक आयोगाचा जनादेश आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

आव्हाडांनी झळकावले ‘आय लव्ह मारकडवाडी’चे बॅनर

विधानसभा परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून ‘आय लव्ह मारकडवाडी’चे बॅनर झळकावले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ डिसेंबरला

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ डिसेंबरला होणार आहे. उद्या रविवारी दुपारपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर विधानसभेत दिली.

अजित पवारांनी रासणेंना सत्ताधाऱ्यांत आणले

भाजपाचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकांवर जाण्याऐवजी चुकून विरोधी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसत होते. तितक्यात अजित पवारांनी त्यांना हाताला धरून सत्ताधारी बाकांवर बसवले. यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…असे म्हणत महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष अधिवेशनात शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच दिलिप वळसे पाटी, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे. उदय सामंत, संजय राठोड यांनीही सुरुवातीला आमदारकीची शपथ घेतली. गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. पहिल्यांदा चैनसुख संचेती यांनी शपथ घेतली आहे. दुसऱ्यांदा शपथ जयकुमार रावल यांनी शपथ घेतली. जयकुमार रावल यांनी जय श्री राम म्हणत शपथ घेतली. तिसरी शपथ माणिकराव कोकाटे यांनी घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ प्रारंभापूर्वी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच नवनिर्वाचित आमदारांनी अभिवादन केले.

भावाभावांचा शपथविधी

विधानसभा सभागृहात निलेश राणे, नीतेश राणे तसेच किरण सामंत व उदय सामंत या दोन भावाभावांच्या जोड्या दिसणार आहेत. आज या भावांनी आमदार म्हणून शपथ घेतली, नीतेश राणे व उदय सामंत हे धाकटे बंधू सभागृहात ज्येष्ठ आमदार असून त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. निलेश राणे व किरण सामंत हे ज्येष्ठ बंधू असले तरी विधानसभेत प्रथमच आले आहेत. निलेश राणे यापूर्वी एक टर्म लोकसभेचे पाच वर्षे खासदारही होते.

नितेश राणेंसह भाजपाच्या ७ आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ

भाजपचे आमदार गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नीतेश राणे, प्रसाद अडसर, राम कदम यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. पहिल्या दिवशी एकूण २०० लोकप्रतिनिधींचा शपथविधी होणार होता. त्यानुसार क्रमकही निश्चित करण्यात आला होता; मात्र काही लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते, तर काहींना सभागृहात येण्यास विलंब झाला. त्यामुळे १७३ जणांनाच आमदारकीची शपथ (Swearing in ceremony) देण्यात आली. उर्वरित ११४ आमदारांना रविवारी आमदारकीची शपथ घ्यावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -