Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! चंद्रपूरमध्ये १०६ जणांना अन्नातून विषबाधा

Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! चंद्रपूरमध्ये १०६ जणांना अन्नातून विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या १०६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आली आहे.



नेमके प्रकरण काय?


सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण १२६ विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली व मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


दरम्यान, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठित करण्यात आलेली असून सदर समिती आपला अहवाल लवकरच सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Food Poisoning)

Comments
Add Comment