Mumbai News : लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन!

निसर्ग अभ्यासकांचे निसर्गाकडून सर्वांनी महानता घेण्याचे आवाहन


मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे नाते जोडू निसर्गाशी (Environment) या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदाही लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ६७वी विवेकानंद व्याख्यानमाला यावर्षी मंगळवार (ता. २६) ते शनिवार (ता. ३०) या कालावधीत लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) येथे दररोज रात्री साडेआठ वाजता आयोजित केली आहे.



यावर्षी 'नाते जोडू निसर्गाशी' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित निरनिराळ्या रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत माहिती देताना, 'निसर्गाकडून महानता घेण्याची आवश्यकता असून तो कोणालाही शिक्षा करीत नाही परंतु त्याच्या विरुद्ध वागल्यास त्याचे परिणाम दिसतात' असे निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांनी म्हटले.



कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे


शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर बोलताना निसर्गप्रेमी कौस्तुभ ताम्हनकर म्हणाले की, कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी ते आचरणात आणणे आवश्यक आहे तरच शून्य कचरा व्यवस्थापन ही संकल्पना यशस्वी होईल.



मुंग्यांच्या १५ हजाराहून अधिक जाती अस्तित्वात


आतापर्यंत सर्वांना लाल, काळ्या, चावणाऱ्या, कामकरी मुंग्या माहित आहेत. परंतु मुंग्यांच्या १५ हजाराहून अधिक जाती असून त्यांना शास्त्रीय नावे असून मुंग्या या एकमेकांना सहकार्य करून परिस्थिती जुळवून घेऊन काम करतात येणाऱ्या परिस्थितीवर मात करून पुढे वाटचाल करतात असे नूतन कर्णिक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया