सोलापूर : देशभरातून लाखोंच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी विधीमंडळ गटनेता निवडीप्रसंगी तसे सुतोवाचही केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या हाचचाली वेगाने सुरु केल्या आहेत.
https://prahaar.in/2024/12/06/credit-for-the-countrys-progress-to-the-constitution-given-by-dr-babasaheb-ambedkar-chief-minister-devendra-fadnavis/
राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आल्यानंतर आता अनेक वर्षापासूनची वारकऱ्यांची काॅरिडाॅरची मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचे वारकरी संप्रदायामधून स्वागत ही केले जात आहे. आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते, यावेळी लाखो भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होते. अन्य वेळीही दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी असते. विठ्ठल दर्शनासाठी येणार्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, विनात्रास विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दी नियंत्रित करता यावी यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे, मध्यंतरी यावरती काम देखील सुरु झाले होते. परंतु, स्थानिक दुकानदारांनी याला विरोध केला आहे. त्यानंतर काॅरिडाॅरची चर्चा थांबली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…