मुंबई : जागतिक बँकेने (World Bank) महाराष्ट्रासाठी १८८.२८ कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. जागतिक बँकेने हे कर्ज कमी विकसित जिल्ह्यांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी दिले आहे. या कर्जामुळे जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्षम करण्यासाठी मदत होईल. ज्यात जिल्हा नियोजना आणि विकास धोरणांचा समावेश असेल, असे बँकेने म्हटले आहे.
Konkan Railway : कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित
या अंतर्गत गुंतवणुकीमुळे जिल्ह्यांना आवश्यक डेटा, निधी आणि कौशल्ये सुसज्ज होण्यास मदत होईल, जेणेकरून जिल्ह्यांचा विकास आणि रोजगार निर्मिती होईल.ज्याने सार्वजनिक पैशाचे मूल्य जास्तीत जास्त वाढेल. या जिल्ह्यांना आवश्यक निधी प्रदान करणे आणि रोजगार निर्मिती धोरणांसाठी कौशल्य प्रदान करण्यासाठी गुंतवणुकीसाठी या कर्जाचा वापर होईल. तसेच पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून, व्यवसायांसाठी ई-सरकारी सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.