रत्नागिरी : वायव्य मुंबईचे खासदार रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.
Miraroad Metro : भीषण अपघात! मेट्रोचे काम करणारा मिक्सर २० फूट खोल खड्डयात कोसळला
वायकर यांनी लोकसभेत रेल्वेसंदर्भातील चर्चेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण या विषयी प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात या विषयाला गती मिळू शकेल. खा. रवींद्र वायकर यांनी हा प्रश्न संसदीय चर्चेत भाग घेताना उपस्थित केल्याने या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोकण विकास समितीचे सदस्य तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे सचिव अक्षय महापदी यांनी आभार मानले आहेत.