Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीMaharashtra CM Oath Ceremony : राज्यात देवेंद्रपर्व सुरु!

Maharashtra CM Oath Ceremony : राज्यात देवेंद्रपर्व सुरु!

मुंबई : राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ (Oath Ceremony) घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्‍यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील.

राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्याआधी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे योगी आदित्‍यनाथ, गुजरातचे मुख्‍यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री पुष्‍करसिंह धामी, गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतरत्‍न सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर,अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी (Oath Ceremony) पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात भगवा रंग आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे. शपथविधी सोहळ्याला बांधण्यात आलेल्या तीनही पंडालचे कापड भगवे आहे.

आज शपथविधी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन तास वीस मिनिटांचा मुंबई दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वाजून ३५ मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरणार आहेत. तेथून ते हेलिकॉप्टरने आय एम एस शिखरा हेलिपॅड येथे येतील.

Devendra Fadanvis : मोठी बातमी ! शपथविधीआधी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

आज मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, येत्या ११ डिसेंबरला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे पदाचा अधिभार घेतल्यावर प्रथेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकार कक्षास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Chitra Wagh : मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नहीं! चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचले

महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात आणि श्री मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -