Tuesday, February 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadanvis : मोठी बातमी ! शपथविधीआधी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

Devendra Fadanvis : मोठी बातमी ! शपथविधीआधी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

बारामती : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. राज्यात जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला. यानंतर अखेर १२ दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज सायंकाळी आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीप्रमाणे विरोधातील नेत्यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

CM Oath ceremoney : महायुतीच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी, अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात

उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण

आज महायुतीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून ३ नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. आता फक्त या ३ नेत्यांचा शपथविधी होणार आहे. राजशिष्टाचारनुसार, या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी फोन देखील केला आहे. फडणवीसांनी आमंत्रणासाठी शरद पवारांना फोन केला होता. मात्र शरद पवार व सुप्रिया सुळे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं समोर आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सोहळ्याला जाणार नसल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्याव्यतिरिक्त कोणते नेते उपस्थित राहणार याची सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -