Chitra Wagh : मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नहीं! चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचले

Share

मुंबई : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजपा (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

चित्रा वाघ यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मी काडतूस आहे, झुकेगा नहीं. ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली. पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ (Devendra Fadnavis) परत आलाय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले.

कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे…. पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय.

‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय!!! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी.

‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों… आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय.

‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. .. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय.

देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला.

पुढची अडीच वर्षं धोरणीपणानं डावपेच आखत राहिला. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे. त्याच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं… पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच…. देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस पुन्हा परत आले आहेत. त्यांचा पिक्चर संपलेला नाही. उलट आता अॅक्शनन् भरपूर असा पिक्चर असणार आहे. कुणी तरी त्यांच्या पिक्चरचं नाव ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं. परंतु चौदा कोटी जनतेने त्यांना पुन्हा एकदा हिरो बनवलं आहे. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनितीत तरबेज, बहि‍णींचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खांदा असं वर्णन त्यांनी फडणवीसांचं केलंय.

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

1 hour ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

3 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

3 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

3 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

3 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 hours ago