CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (CM Oath Ceremony) उद्या मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी लाडक्या बहिणींसाठीही विशेष आमंत्रण असणार आहे. त्यामुळे आझाद मैदानावर होणारी मोठी गर्दी पाहता मुंबई वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. यावेळी अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून ते शपथविधी कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.



कोणते मार्ग बंद?



  • महापालिका मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद

  • हजारीमल सोमानी मार्ग - चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित

  • प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद

  • आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा आवाहन


पर्यायी मार्ग कोणते?



  • चाफेकर बंधू चौक - हुतात्मा चौक काला घोडा के दुबाश मार्ग शहीद भगतसिंग मार्ग इच्छित स्थळी प्रवास.

  • दक्षिणेकडील मार्ग एनएस रोड आणि कोस्टल रोडवरून श्यामलाल गांधी जंक्शनकडे वाहतूक वळवली जाईल.
    पर्यायी मार्गः एनएस रोडचा वापर करावा.

  • सय्यद जमादार चौक ते वोल्गा चौक या मार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असेल.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम