Sunday, February 9, 2025
Homeक्रीडाAryaman Birla: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, ७० हजार कोटी नेटवर्थ

Aryaman Birla: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, ७० हजार कोटी नेटवर्थ

मुंबई: जर भारतातील अथवा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल बोलायचे झाल्यास सगळ्यात पहिले नाव येते विराट कोहलीचे. मात्र तुम्हीही जाणून हैराण व्हाल की कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर नाही आहे. तर आणखी एक दुसरा भारतीय आहे जे नेटवर्थ आणि कमाईच्या बाबतीत टॉपवर आहे. आम्ही बोलत आहोत आर्यमन बिर्लाबद्दल(Aryaman Birla). मध्य प्रदेशसाठी डोमेस्टिकसाठी सामने खेळणाऱ्या आर्यमनने राजस्थान रॉयल्ससाठीही प्रतिनिधित्व केले आहे.

खरंतर, आर्यमान आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. आर्यमानने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने ९ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. तर ४ लिस्ट ए सामने खेळले आहेत. आर्यमान आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे. त्याने संघासाठी कधीही पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आर्यमान

आर्यमान टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. मात्र डोमेस्टिक स्तरावर मध्य प्रदेशसाठी सामना खेळला आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. मिडिया रिपोर्ट्नुसार आर्यमानची नेटवर्थ साधारण ७० हजार कोटी रूपये आहे. त्याची अधिकतर कमाई बिझनेसच्या माध्यमातून होते. आर्यमानला २०२३मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँढ रिटेल लिमिटेडचे डायरेक्टर बनले होते.

वयाच्या २२व्या वर्षी घेतली निवृत्ती

आर्यमानने नोव्हेंबर २०१७ध्ये फर्स्ट क्लासमध्ये पदार्पण केले. त्याने मध्य प्रदेशसाठी खेळताना या फॉरमॅटमध्ये ४१४ धावा केल्या. त्याने करिअरमध्ये १ शतक आणि १ अर्धशतक ठोकले आहे. आर्यमानने शेवटचा फर्स्ट क्लास सामना जानेवारी २०१९मध्ये आंध्र प्रदेशसाठी खेळला. तर हैदराबादविरुद्ध २०१८मध्ये लिस्ट ए सामन्यात पदार्पण केले. आर्यमान लिस्ट एचे ४ सामने खेळला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -