Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीGoa Navy Submarine Accident : धक्कादायक! गोव्यात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची...

Goa Navy Submarine Accident : धक्कादायक! गोव्यात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; दोन खलाशांचा मृत्यू

पणजी : अरबी समुद्रात मासेमारी बोट आणि नौसेनाची पाणबुडी यांची धडक होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात नौसेनेच्या पाणबुडीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी मासेमारी बोटीवरील तांडेल विरोधात यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटीवरील दोन्ही खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे. ही धडक गोवा किनारपट्टी जवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पैरीस्कोप डेप्थ मेंटेन करुन गोव्याच्या तटावरुन वेगाने जात होती. दरम्यान पाणबुडीच्या उजव्या बाजुस एक मासेमारी बोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर दिसून आली, सदर मासेमारी बोट एका जागेवर उभी होती. प्रकाश फार कमी असल्यामुळे समोरची बोट स्पष्ट दिसत नव्हती.

भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत यांनी सांगितले की, मासेमारी बोटीचे ऑटोमेटीक आयडेन्टीफिकेशन सिस्टम काम करत नव्हते. त्यामुळे मासेमारी नौकेचा वेग, स्थान, दिशा, नाव समजून येत नव्हते.

दोन्ही बोटींमध्ये सुरक्षित अंतर राखून एन.एस. करंजा पाणबुडीने दिशा बदलून आपला वेग कायम ठेवला. पाणबुडीने मासेमारी बोटीपासून वाचण्याचे सर्व प्रयत्न करुनही ती मासेमारी बोट पाणबुडीला धडकली आणि समुद्रात पलटी होऊन बुडाली. ही धडक गोव्याजवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मासेमारी बोटीवरील २ खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात बेपत्ता झालेल्या खलाशांचा मृतदेह २८ नोव्हेंबरला सापडला. यानंतर हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात पाठवले असून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे. या अपघातात नौसेनेच्या पाणबुडीचे जवळपास १० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ११ खलाशांच्या दुखपतीला आणि दोन खलाशांच्या मृत्यूला कारणीभूत असल्यामुळे मासेमारी बोटीवरील तांडेल विरुद्ध यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -