आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

मुंबई : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे’...असं म्हणत या चित्रपटाचे रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.


असं म्हणतात, 'पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही,' प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘इलू इलू’ हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्टॅलजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके व्यक्त करतात.



वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चेहरा नेमका कोणाचा? याचा उलगडा लवकरच होणार आहे.


‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम