'The Sabarmati Report : पंतप्रधान मोदींनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमा, निर्मात्यांचे केले कौतुक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, सोमवारी गुजरात दंगलीवरील ‘द साबरमती रिपोर्ट’('The Sabarmati Report') हा चित्रपट पाहिला. यावेळी मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि इतर सहकारी उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांचे अभिनंदन करायला हवे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.


पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हणाले की, एनडीएच्या खासदारांसोबत साबरमती रिपोर्ट पाहिला. निर्मात्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो. अभिनेता विक्रांत मॅसीनेही स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांचा चित्रपट पाहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. मात्र, याआधी गृहमंत्री अमित शहा यांनीही हा चित्रपट पाहिला होता, त्यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आणि याला सत्याचा विजय म्हटले.


अमित शाह यांनी साबरमती रिपोर्ट पाहिल्यानंतर सांगितले होते की, एखाद्या शक्तिशाली इकोसिस्टमने कितीही प्रयत्न केले तरी सत्य कायमचे लपवता येत नाही. द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाने या परिसंस्थेला अविश्वसनीय धैर्याने नाकारले आहे. भविष्यावर परिणाम करणाऱ्या या भागाचे सत्य दिवसाढवळ्या उघड झाले आहे.


‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 2002 च्या गुजरात दंगलीवर तयार करण्यात आला आहे. साबरमती एक्स्प्रेसला लागलेली आग हा अपघात नसून षड्यंत्र असल्याचे या चित्रपटात सांगण्यात आले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई केली आहे, परंतु विक्रांतच्या मागील रेकॉर्डचा विचार करता हे प्रमाण कमीच वाटते. मात्र, राजकीय वर्तुळात या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगल्याने हा चित्रपट खूप पाहिला जात आहे.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं