HIV: भारतात नवीन एचआयव्ही रुग्णसंख्येत घट, आरोग्य मंत्र्यांची माहिती

  155

इंदौर:  भारत सरकार २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. २०१० पासून भारतात नवीन एचआयव्ही(HIV) रुग्णांची संख्या ४४ टक्क्यांनीे कमी झाली आहे, जी जागतिक स्तरावरील ३९ टक्क्यांच्या घट दरापेक्षा जास्त आहे. एकूणच एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही ७९ टक्के घट झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितले.

जागतिक एड्स दिनानिमित्त, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी आज मध्य प्रदेशातील इंदौर येथील देवी अहिल्या विद्यापीठाच्या सभागृहात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत जागतिक एड्स दिन २०२४ निमित्त आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वर्षीची संकल्पना, “अधिकारांचा मार्ग घ्या” अशी असून यामध्ये सर्वांसाठी विशेषत: एचआयव्ही/एड्स ग्रस्तसाठी समान हक्क, सन्मान आणि आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय एड्स आणि एसटीडी नियंत्रण कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याचा उल्लेख करून एचआयव्ही/एड्सचा सामना करण्यासाठी सरकारच्या अतूट दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी एनएसीओ NACO आणि राज्य एड्स नियंत्रण संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित केले. ज्यामुळे भारतात २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये नवीन संसर्गासह एचआयव्ही महामारीचे प्रमाण जवळपास ४४ टक्क्याने कमी झाले आणि एड्सशी संबंधित मृत्यू ७९ टक्क्यांनी कमी झाले.

जागतिक एड्स दिन २०२४ च्या 'अधिकाराचा मार्ग घ्या' संकल्पनेला अनुसरून, जेपी नड्डा यांनी एचआयव्ही/एड्स ग्रस्त लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, कायदेशीर संरक्षण, आरोग्यसेवा प्रवेश आणि सामाजिक बदल यावर भर देण्याप्रति केंद्र सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. ते म्हणाले, “जागतिक एड्स दिन हा एक क्षण आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपण सर्व जण एड्सविरुद्धच्या लढाईत एकत्र आहोत. तसेच या आजाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांच्या प्रयत्नांची आठवण ठेवण्याचा देखील हा क्षण असल्याचे ते म्हणाले."

अत्यंत काळजी आणि समर्पणाने अशा आजारांना हाताळल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना नड्डा यांनी नमूद केले की, ते नेहमीच संक्रमित लोकांच्या संपर्कात असूनही त्यांचे कार्य सुरू ठेवतात. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

Comments
Add Comment

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश