'ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राहुल यांनी राजीनामा द्यावा'

नवी दिल्ली: ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि मतपत्रिका परत आल्यावरच निवडणूक लढावी असा टोला भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी लगावला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपने जोरदार टीका केली आहे. याला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपर परत आल्यानंतरच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करावे. त्यांनी असे केले तर कदाचित त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अन्यथा हे आरोप केवळ पोकळ शब्दच राहतील.


ईव्हीएम आधारित निवडणूक प्रक्रियेतून निवडून येऊन ते खासदारही झाले आहेत, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे असे भाटिया यांनी सांगितले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेसने न्यायालयात जावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हता अधोरेखीत केली आहे. प्रियंका गांधी यांनी लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. ही मोठी विडंबना असून काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा