Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान


चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Baba Saheb Ambedjar Jayanti) यांच्या जयंतीचा उत्साह आणि मिरवणुकीचा थाट सुरू असतानाच, दुसरीकडे एका गरीब कुटुंबावर आभाळ फाटल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) लागलेल्या भीषण आगीत स्थानिक रहिवासी गोविंद श्रीधर निर्भवणे यांचे घर आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या मंगरूळ गावात काल भीमजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. संपूर्ण गाव उत्सवात मग्न असताना अचानक गोविंद निर्भवणे यांच्या घराला आग लागली. वाऱ्याचा वेग आणि आगीचे स्वरूप भीषण असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत निर्भवणे कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. घरमालक गोविंद निर्भवणे आणि त्यांच्या पत्नी मोनिका निर्भवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत खालील वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत निर्भवणे कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांच्या हक्काचा संसार डोळ्यादेखत राख झाला आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वस्तूंमध्ये घरातील टीव्ही, फ्रिज यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्टीलचे कपाट पूर्णपणे जळाले आहे. विशेष म्हणजे, कपाटात साठवून ठेवलेली ३२ हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रेही आगीत भस्मसात झाली. कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी साठवलेली गव्हाची दोन पोती आणि इतर धान्यही खाक झाले आहे. याशिवाय, घरातील दैनंदिन वापराची भांडी, कपडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे शालेय दप्तर, पुस्तके व गणवेशही जळून गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वस्व गमावल्यामुळे हे कुटुंब सध्या अत्यंत हतबल झाले आहे.



मदत आणि पंचनामा


आगीची माहिती मिळताच मंगरूळ सोम्या टोल प्लाझा प्रशासनाने तत्परता दाखवत अग्निशामक दलाला पाचारण केले. ग्रामस्थांच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. घटनेची गांभीर्याने दखल घेत चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित महसूल विभागाला तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की कोणी अज्ञात व्यक्तीने लावली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिरवणुकीच्या जल्लोषात असतानाच ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात असून, पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ भीमराव निर्भवणे आणि इतर नागरिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

Crime News : प्रियकरासाठी पतीचा 'गेम', आधी छतावरून फेकलं, मग रुग्णालयात केला 'काम तमाम'

नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन  तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी