Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ओव्हरलोडेड वाहनांसाठी टोल शुल्काबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि संकलन) चौथी दुरुस्ती नियम, २०२६’ अंतर्गत हे बदल करण्यात आले असून, १५ एप्रिल २०२६ पासून यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


नव्या नियमांनुसार सरकारने दंडाची आकारणी ही ओव्हरलोडिंगच्या टक्केवारीनुसार निश्चित केली आहे. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:




  1. १० टक्क्यांपर्यंत ओव्हरलोड: जर वाहनावर निर्धारित क्षमतेपेक्षा १०टक्क्यांपर्यंत अतिरिक्त वजन असेल, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

  2. १० ते ४० टक्क्यांपर्यंत ओव्हरलोड: अशा वाहनांकडून मूळ टोल दराच्या (Base Rate) दोन पट दंड वसूल केला जाईल.

  3. ४० टक्क्यांहून अधिक ओव्हरलोड: अशा वाहनांना मूळ टोल दराच्या तब्बल चार पट दंड भरावा लागेल.

  4. टोल नाक्यावरच होणार वजनाची मोजणी

  5. महामार्गावरील टोल प्लाजावर बसवलेल्या प्रमाणित वजन यंत्रांच्या मदतीने ओव्हरलोडिंगची तपासणी केली जाईल. विशेष म्हणजे, ज्या टोल नाक्यावर वजनाची सुविधा नसेल, तिथे हा अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही. आधुनिक ‘वेट-इन-मोशन’ (WIM) तंत्रज्ञानामुळे वाहन चालत्या स्थितीत असतानाच त्याचे वजन मोजणे शक्य होणार आहे, ज्यामुळे वेळ वाचेल आणि प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

  6. फास्टॅग आणि ‘वाहन’ पोर्टलची जोड

  7. ओव्हरलोडिंगचा दंड केवळ फास्टॅगच्या माध्यमातूनच कापला जाईल. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची संपूर्ण माहिती ‘राष्ट्रीय वाहन रजिस्टर’ (Vahan) मध्ये नोंदवण्यात येईल. ज्या वाहनांकडे वैध फास्टॅग नसेल, त्यांच्यावर सध्याच्या नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

  8. रस्त्यांची दूरवस्था रोखणे आणि रस्ते अपघात कमी करणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे. ओव्हरलोडिंगमुळे हायवेच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. नवीन नियमांमुळे मालवाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. काही सुरू असलेल्या खासगी प्रकल्पांसाठी संबंधित कंपन्यांच्या संमतीनंतरच हे नियम लागू होतील.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक